Translate

16 January 2014

.तिठा.

तुझ्या माझ्या
शहरांचे तिढे सोडवता सोडवता...
हात बधीर होतात आपले
आणि पाय स्थानबद्ध...

त्या शहरांच्या सावल्याही
आपल्या सावल्यांचा अविभाज्य भाग...
भंजाळलेल्या पेठा,आंदोलन,
भूक-खरेदी-विक्री ,भेसूर-बेसूरपणा
देऊळ-भोंगा,बागा-बांगा,रस्ते-झा डं,
प्लीज एवढा पत्ता सांगा ना...
सारं..सारं..त्यात..

कुठे पोहोचणार..?
डोळ्यांचे भोवरे होईपर्यंत
अंतरं मोजतो आपण...

डोक्यावर
अशी आपापली शहरं उचलून..
उभे असतो आपण
तिठ्यावर...

चौथा रस्ता शोधत...!!


......चैताली.

No comments: