Translate

27 March 2012

वेडा फकिर....

बेचैनीची झुंबरं...
डोक्यावर घेवून फिरताना....
भर दुपारी डोक्यात घुसलेला सूर्य...
मरणाची नशा देतो....
फर्र फर्र कानात घुसलेली हवा...
काळजाला चेतती ठेवते..
ही आतली झुंबरं....
तर जास्तच लख-लख...प्रशस्त...
वाटतं...
सगळ्यांमध्ये बसलेलं असताना...
प्रकाश भस्सकन डोळ्यांतून सांडतो की काय...

"लक्ष कुठेय तुझं..???"
कोणीतरी विचारतं...
सारां चित्तं एकटवून...
ओळखीचं हासते मी...
त्यांना साहवेल इतपतच...!

त्यांना काय माहित...
कुठे-कुठे फिरत असते मी..
कळस पायथे पालथे घालत...
धुकं फूंकत...रस्ते मिरवत..
मला नसते कसली शुद्ध....
ना कसली फ़िकिर...
.
आत असतो एक...
वेडा फकिर....
वेडा फकिर....!!

       .....चैताली.

21 March 2012

साचलेपण...!

जगण्याचं कोलीत हातात घेऊन...
रग्गड श्वास ओतले..

अवधानं अन व्यवधानं सांभाळत..
भासांचे दाखले दिले...

प्रतिसादांचे कांगावे...
थंडपणाचे कंगोरे...
कातडीभर माखले...

अस्वस्थ रकाने..
आकाशभर रेखले...

नादान तोहमतींचे हासू...
नजाकतीने पाळले...

आणि असोशिनं...
सांभाळलं...
.
.
शरीराचं साचलेपण...!


     ....चैताली.

ghettos....

Many a times…
An endangered thought of being me… !
.
I wander through the ghettos of labeled my selves…
Running from to collect pieces of me….
Tired… withered me ….
About to leave myself in doubt…
.
Then the girl with shiny locks….
Twinkled eyes…
Raises her hand towards me…
(who is she…?)
.
Stunned me,
Start walking (again??) on my own way…
And the exhausting thought…
Miles away….!

        …..Chaitali .

पर्यायवाची...

पर्यायवाची शब्दांच्या माकड-उड्या...

शब्दांची सभ्य-असभ्य टाळाटाळ ....

मिळमिळीत जगण्याच्या ओकाऱ्या...

back to basics  म्हणणारे चाक...
.
.
अन माझ्या भोचक होत जाणाऱ्या कविता...!

 .....चैताली.

17 March 2012

भेगा...

भिंतिंना पडलेल्या भेगा...
खूपच स्पष्ट दिसताहेत..
३-डी असल्यासारख्या...
इतक्या जवळ...
जणु बुबूळंच भेगाळलीत...
आणि त्यातून बाहेत पडत आहेत..
थेंब-थेंब घरांची छपरं..
ज्यांमधूनही कौल-कौल पाऊस ठिबकतोय...

आणि ती छपरं झेपावत आहेत...
प्राणांतिक वेगाने....
प्राणांकित घरं शोधण्यासाठी...
जी नसतील भित्तिक्षालक....
ज्यांना(ज्यांच्या) नाहीच मुळी...
भेगाळल्या मितींच्या क्षिती...!!


            ....चैताली.

10 March 2012

On the verge


On the verge of thinking…..
Let me flow…. My dear…!
I am talking to myself…
.

Oh..!  Can’t you hear?


          ......chaitali.

02 March 2012

विंझोळ....

एका ढासळत्या क्षणी...
धास्तावल्या गात्रांनी..
चुकून आत्मा स्पर्शला..

त्राहि माम..त्राही माम..
म्हणत मग रंध्रांनी..
सळसळ प्रकाशरेषा...
त्वचेवर आंथरल्या..

अंधारभुक्त बुब्बुळं..
चुळबूळून उजळली..
हातांची बोटं फटफटली...

ठिय्या मांडून बसलेल्या...
ठळक आयुष्याच्या ओळी...
कपाळभर खुसफूसल्या...

अन मी क्षणभर का होईना..
सारे विंझोळ..
ओंजळीत घेऊन...
ओठभर हालले...!


    ....चैताली.